फुलंब्री, (प्रतिनिधी): वडोद कान्होबा (ता. खुलताबाद) येथे एका घरगुती कार्यक्रमादरम्यान दिलेल्या जेवणातून १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (ता. २०) समोर आली. उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने सर्व रुग्णांना तातडीने फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वडोद कान्होबा येथे घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक व ग्रामस्थ जमले होते. कार्यक्रमानंतर नातेवाइकांनी मंगळवारी (ता. १९) सकाळी सामूहिक जेवण केले. तेच जेवण रात्री पुन्हा खाल्ल्यानंतर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काहींची प्रकृती बिघडली. त्रास वाढू लागल्याने ग्रामस्थांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरबाज शेख आणि डॉ. मोहिते यांनी सलाइन व आवश्यक औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्याने सर्वांची प्रकृती आता स्थिर झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये कविता गणेश ग्रामीण रुग्णालयात वडोद कान्होबा येथील अत्रातून विषबाधा झालेले एकाच कुटुंबातील १४ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील बारा जणांना आता तब्येत स्थिर असल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उर्वरित दोन जणांवर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत पाठवण्यात आले आहे. डॉ. मुजफ्फर मण्यार, वैद्यकीय अधीक्षक, फुलंब्री ग्रामीण रुग्णालय बोर्डे, शिवानी गणेश बोर्डे, ओम ज्ञानेश्वर मोरे, मीनाबाई बंडू मोरे, आरोही नकुल मोरे, तुलसी किरण मोरे, भाविका नीलेश मोरे, सतीश शंकरराव झुजे, शंकर भाऊराव झुजे, भाऊसाहेब शंकरराव मोरे, अनुराधा संदीप मोरे, सुवर्णा अनिल काळे, सचिन बंडू मोरे आणि बंडू पांडुरंग मोरे यांचा समावेश आहे. अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डॉ. अरबाज शेख यांनी सांगितले.















